दिनांक 30 जून 2025 रोजी पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे गृहरक्षक दलाचे सत्र क्रमांक 05 सुरू झालेले असून माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सत्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.सदर वेळी माननीय उपप्राचार्य श्रीमती राजश्री पाटील (प्रशासन), तसेच माननीय उप प्राचार्य श्री सुनील शेटे (बाह्य वर्ग), राखीव पोलीस निरीक्षक श्री विलास कदम व सदर सत्राचे सत्र समन्वयक पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी गोड तसेच अंतरवर्ग अधिकारी, बाह्यवर्ग अधिकारी अंमलदार तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सदर वेळी मा. उप प्राचार्य श्रीमती राजश्री पाटील (प्रशासन) यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना आगामी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले
गृहरक्षक दल सत्र क्रमांक पाच उद्घाटन कार्यक्रम

